Tuesday, 19 May 2020

किस्सा Lockdown चा: भाग ३रा

किस्सा Lockdown चा: भाग ३रा 
मास्क , सैनिटाइजर आणि तळीराम
           तुम्हाला शीर्षक वाचून लक्षात आलेलेच असेल की काय लिहिंनार आहे ते ......
          अन्न , वस्त्र , निवारा , याबरोबर आता मास्क , सैनिटाइजर हे देखील एक मानवी जीवनाची गरज झाली आहे असा फील येतोय सध्या.....
  सगळे जण मास्क लावून फिरत आहेत , त्याचबरोबर सैनिटाइजर चा वापर देखील खुप वाढल आहे . पुर्वी लोक सांगयची की हात , पाय धू म्हणून पण कोणी ऐकत नव्हते , आता मात्र सगळे जण घाबरले.....असो या कोरोना ने आपल्यावर खुप वाईट वेळ अनाली आहे , सगळे घरात कैद आहेत .......फक्त आपणच नाही तर , या आजराने देवाना देखिल सोडले नाही ?
आज सर्व प्रार्थना क्षेत्र बंद आहेत , म्हणजे देवान देखिल स्व:त ला qurantine करून घेतले आहे .......
त्यात सरकारच्या तिजोरित पैसे नाहीत म्हणून मद्य विक्री सुरु केलि , काय सुरु आहे देशात काही कळत नहिय .....म्हणजे खरच एवढी बिकट वेळ आली आहे काय? की  दारू विक्री करून पैसे येणार आहेत त्या तिजोरित ? आणि लोकांच्या रिकाम्या होणार ,हिंसाचार वाढणार....याचा विचार कोन करणार ?
असो आपण सर्व जण घरात राहु सुरक्षित रहु , आणि काळजी घेऊ .....

Wednesday, 13 May 2020

किस्सा Lockdown चा : भाग २

तर मंडळी आपण पहिला भाग वाचला खूप छान प्रतिक्रिया दिल्या , त्याबद्धल आभारी आहे .
किस्सा Lockdown चा : भाग २
       खरं तर आपण या lockdown  तसेच या corona आजरा मध्ये खूप काही शिकलो आहे बरोबर ना ? सगळ्यात महत्वचे म्हणजेे आपण खुप छान संयम जो दाखवला आहे त्याला तोड़ नहिय , त्याचबरोबर खुप गोष्टि आपण शिकलो आहे . म्हणजे एक तर काही लोक आहे त्या गोष्टीत समाधान मानायला शिकलो , घरी आहे त्यात मनोरंजन कसे करतील याचा विचार करु लागलो , आणि मुख्य म्हणजे आहे त्या लोकात त्यांना सहन करतो आहेत 😊 ,खुप दिवसंचा संवाद सुरु झाला , एकमेकांना समजून घेणे , प्रत्येकांच्या विचार काळु लागले .
असो या कोरोना सारख्या भीषण आजरामधे आपण खुप धैर्याने पुढे जात आहोत याच खरच कौतुक आहे .मला वाटत भारतात पहिल्यांदा एवढे लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत याच देखील कौतुक आहे .कोरोना चे खुप काही impact देखील आहेत .
अश्याच खुप साऱ्या positive विचारासह पुढे जाऊया आहे या कोरोना रोगावर मात करूया , पुन्हा भेटुया पुढच्या भागात ......

Tuesday, 5 May 2020

किस्सा lockdown चा : भाग एक

तसं बघायला गेलं तर ब्लॉग लिहिणे हे काय माझ काम नाही किंवा सवयीचं नाहीय , पण एक वेळ आहे आणि एक आवड जपावी हाच केवळ हेतू 🤗.(जर काही चुकलं तर मोठ्या मनाने माफ करा )
किस्सा lockdown चा : भाग एक 


एक तर फक्त घरी बसून राहणे हे मला जमत नाही , आणि कोरोना पासून वाचायच असेल तरी घरी राहा हे सगळे सांगत होते ....
आपण सगळे lockdown मुळे घरात अडकलो आहोत हे सगळे बोलत आहेत , पण कोणी विचार केला आहे त्या आई च्या मातेचा कि जी गेले कित्येक दिवस lockdown जगत।आहे अनुभवत आहे .....
हो याच विचारत मी एक लेख लिहावा असा विचार करत होतो
त्यात ब्लॉग हा एक उत्तम पर्याय मला सुचला , तसं थोडा कठीण आहे पण केला तर सगळॆ सोपे हे आईच म्हणाने आहे , असो तर lockdown चा उपयोग आणि वेळ हे दोन्ही सत्कारणी लावायचं असा विचार सुरू होता ,
त्यात मग आईचा वाढदिवस आला ....
जस आपण पोलीस , डॉक्टर आणि सरकारी कर्मचारी यांचं कौतुक केलं पण , आपल्या प्रतेकाच्या घरात एक आई असते तीच कौतुक आणि एक मदत म्हूणन हात कोण पुढे करनार हा विचार डोकं खात होता ....
पुढे काय होतय , या साठी थोडा वेळ वाट बघावी लागेल ....